(मुंबई)
चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्राने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याने राज सरकारनेही आपल्या पातळीवर आरोग्यं यत्रणा सक्रीय करायला सुरूवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, ओमायक्रॉनचा व्हेरिएंट साधारण चारजणांना संक्रमित करत होता, मात्र हा नविन व्हेरिएंट आहे. त्यासाठी नवीन नियमावली अंमलात आणावी लागेल. महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचा एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. भारतात चार रूग्ण आहेत, त्यामध्ये गुजरात आणि ओरिसा राज्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात अद्याप रुग्ण आढळलेला नाही. मात्र लहान मुले व वृद्ध नागरिकांनी आतापासूनच शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि वॅक्सीनेशन पंचसूत्री –
आरोग्यमंत्री म्हणाले की, ओमायक्रॉन बाधित एक रूग्ण हा चार जणांवर परिणाम करत होता. मात्र या व्हेरिएंटचा वेग थोडा जास्त आहे, या व्हेरिएंटचा एक रूग्ण हा पुढे दहा जणांवर परिणाम करतो, अशी माहिती मिळाली आहे. मात्र त्यामुळे भीती नको पण काळजी घ्या. चीनमधील बीएफ ७ हा व्हेरिएंट पूर्वी भारतात आढळलेला आहे, त्यामुळे या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नाही. वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. पंचसूत्रीचा वापर, पूर्वीप्रमाणेच टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि वॅक्सीनेशन या पद्धतीच्या पंचसूत्रीचा अवलंब आपण केला पाहिजे. अशा पद्धतीचं मार्गदर्शक तत्व हे संपूर्ण आरोग्य विभागाला दिले आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.