मुलाचे वय अवघे १ वर्ष कोरोना पाॅझीटी व तसेच दुसरी मुलगीही पाॅझीटीव, आई बाबाही पाॅझीटी व इतके असूनही दुःखातून आनंद शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न ‘हेल्पींग हँड’च्या माध्यमातून झाला आहे.
पहील्या वाढदिवसाच्या प्रत्येकाच्या संकल्पना असतात पण आज एक अनोखा वाढदिवस रत्नागिरीच्या शिर्के हायस्कुलमध्ये हेल्पींग हँडद्वारे साजरा झाला. एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला तो ही मुलगा पाॅझीटीव असूनही. केक कापतानाचे मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून दिवसभराचा शीण कुठे निघून गेला हे उपस्थितांना कळलच नाही. त्याची बहीण आणि आई बाबा पाॅझीटीव असूनही मुलाच्या चेहर्यावर हास्य फुलताना पाहून खूप छान आणि बरे वाटले.
प्रसंग कितीही दुःखाचा असला तरी त्यातूनही सुख शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न रत्नागिरीत हेल्पींग हँड मार्फत झाला.