(हैदराबाद)
पतंजली हेल्थ रिसर्च सेंटरमध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान एक लाजिरवाणी घटना घडली. ऑनलाइन बैठकीत अचानक पॉर्न व्हीडीओ सुरू झाला. ऑनलाइन बैठकीत हा प्रकार अचानक सुरू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी हरिद्वारमधील बहादराबाद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटची ऑनलाइन मींिटग सुरू असताना महाराष्ट्रातील पुणे येथील झूमवर कनेक्ट झालेल्या एका तरुणाने पॉर्न व्हिडिओ सुरू केला. या घटनेबाबत कमल भदोरिया आणि शिवम वालिया यांनी पतंजलीच्या वतीने अहवाल दाखल केला आहे.
देश-विदेशातील लोक ऑनलाइन या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट होऊन अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करत होते. यादरम्यान ही घटना घडली. या बैठकीत महिलांचाही मोठा सहभाग होता. या प्रकरणी पुण्यातील येरवडा येथील बीकॉम कॉलेज कॅम्पसजवळ राहणाऱ्या आकाशविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.