(मुंबई)
राज्यात काल ७ हजार ६८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी २०२३ ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकवत प्रथक क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने १२१५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.
राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. काल मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये भाजपने २०२३, राष्ट्रवादीने १२१५, काँग्रेसने ८६१, शिंदे गट ७७२, ठाकरे गट ६३९ तर इतर पक्षांनी ११३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.
राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सरपंचपदी भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. आकडेवारीनुसार, १८७३ ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. तर त्या खालोखाल राष्ट्रवादीचे १००७ ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. शिंदे गटाने ७०९ ठिकाणी तर ठाकरे गटाने ५७१ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. काँग्रेसने ६५७ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. इतर पक्षांनी आणि अपक्षांनी ९६७ ठिकाणी विजय मिळविला आहे.
ग्रामपंचायती निवडणुकीत एकत्रित विचार करता भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीला भारी पडल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे २७९५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने २७१५ ठिकाणी विजय मिळवला. तसेच इतर आघाड्यांनी ११३५ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. राज्यातील ६१६ ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत.
राज्यातील ग्रामपंचायतींचे एकूण बलाबल
भाजप २०२३
राष्ट्रवादी १२१५
काँग्रेस ८६१
शिंदे गट ७७२
ठाकरे गट ६३९
इतर ११३५
सर्वाधिक सरपंच भाजपकडे
भाजप १८७३
राष्ट्रवादी १००७
शिंदे गट ७०९
ठाकरे गट ५७१
काँग्रेस ६५७
इतर ९६७
भाजप-शिंदे गटाने एकूण २७९५
मविआ २७१५
इतर ११३५
एकूण सदस्य संख्या- ६५,९१६
(त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य- १४,०२८)
निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा
– ७६१९
बिनविरोध विजयी सरपंच- ६९९
एकूण ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.