कोव्हीड काळात निर्माण झालेल्या विविध समस्या मार्गी लावण्यात याव्यात या करिता माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेवतीने २१ मे २०२१ रोजी मंडणगड तहसिल कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. खाजगी कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आर्थीक साह्य मिळावे, तौक्ते चक्री वादळातील नुकसानग्रस्त जनतेचे नुकसानीचे पंचनामे तातडीने पुर्ण करुन त्यांना शासनाची मदत मिळावी. खऱीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना भात बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात यावे. याचबरोबर पेट्रोल, गँस, खते इंधन दरवाढ थांबवावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही सादर करण्यात आलेल्या चार निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी माजी आमदार संजय कदम, सौ. सायली कदम यांच्यासह तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम, राष्ट्रवादीचे भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, दीपक घोसाळकर, सुभाष सापटे, मोबीन परकार, राजा लेंढे, दत्ता दळवी, राकेश साळुंखे, अनिल घरटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोव्हीड काळात विविध कारणांनी सर्वसामान्यांचे जीवन त्रस्त झाले आहे यात खाजगी रुग्णालयात निरुपयाने उपचार घ्यावा लागणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांना भरमसाठ बिले आकरली गेली आहेत खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार करुन अनेक लोक बरे झाले आहेत त्यांचे उपचार बीलापोटी शासनामार्फत आर्थीक साह्य तातडीने मिळावे. तौक्ती चक्रीवादळात तालुक्यातील सामान्य जनता व शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. मागील वर्षीच्या निसर्ग चक्री वादळाने तालुक्यातील जनता आधीच बेजार आहे, देव्हारे पंदेरी बाणकोट पंचक्रोशीसह तालुक्यातील आंबा फिळाचे वादळाने व पावसाने नुकसान झाले आहे त्याचा पंचनाम करुन शासकीय नुकसान भरपाई मिळावी.
पेट्रोल डिझेल गँस खते यांच्या किंमत केंद्र शासनाने वाढविल्या आहेत जनतेला रोजगार नाही दरवाढीने जनता मेताकुटीस आली आहे. ऱॉकेलही उपलब्ध नाही दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा शाखेकडून निषेध करत दरवाढ मागे घेण्याची मागणी कऱण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्र शासनाचे विरोधात आंदोलन करणारे असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. कोकणातील खरीप हंगामातील भातशेती करिता संकरित आणि सुधारीत बी पेरणीकरिता जिल्हा नियोजन विकास निधीमधून अखर्चित निधी खर्च जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानातील बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी कऱण्यात आली आहे.