(लांजा / प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द कातळवाडी येथे डेल्टा कंपनीच्या पाईपची 27 हजारांची चोरी झाल्याची घटना 12 डिसेंबर रोजी घडली. याबाबतची फिर्याद आबासाहेब नामदेव बोरकर (46, ठेकेदार, वेरवली बु. तेलीवाडी येथे भाडयाने, मूळ सोलापूर) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबासाहेब बोरकर यांनी डेल्टा कंपनीचे एचडीपी पाईप हे वेरवली खुर्द ते पडवण येथील हरिश्चंद्र भिकलिंग वेरवलकर यांच्याकडे भाडयाच्या खोलीत ठेवले होते. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 13 डिसेंबर सकाळी 8.30 वा. च्या सुमारास येथे असलेले 27 हजार 500 रुपयांचे काळया रंगाचे डेल्टा कंपनीचे एचडीपी पाईप चोरीस गेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर रोजी तकार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.