(मंडणगड / प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील केळवत येथे मालकाने नोकराला फावडयाने छातीत, पाटीत जोरदार मारहाण केल्याने तरुण जखमी झाल्याची घटना 15 डिसेंबर रोजी घडली. लालू रमण भुय्या (45, सापटेवाडी येथे भाडयाने, मूळ झारखंड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भुय्या यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रवींद्र मेहता (सध्या चांभारवाडी, मंडणगड, मूळ झारखंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र मेहता हा कॉन्ट्रक्टर आहे. त्याच्याकडे लालू भुय्या हे हेल्पर म्हणून काम करतात. नेहमीपमाणे लालू भुय्या हे 15 डिसेंबर रोजी कामाला गेले होते. यावेळी ठेकेदाराने त्यांना फटाफट माल बनाओ असे बोलला. त्यावेळी लालू याने सांगितले की, ‘मै क्या जानवर हू, मै आदमी हू’ असे बोलला याचा राग आल्याने रवींद्र मेहता हा अंगावर धावून जात लालू याच्या हातातील फावडे खेचून छातीवर आणि पाठीत जोराजोराने फटके मारले. या मारहाणीत लालू हा जमिनीवर कोसळला. तो जमिनीवर कोसळताच रवींद्र मेहता याने हातातील फावडे फेकून देत एका लाकडी बांबूने पाठीवर, डाव्या खांद्यावर, पोटावर, डाव्या पायाच्या पोटरीवर फटके मारुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत लालू हा जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान या मारहाणीची फिर्याद लालू याने मंडणगड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी रवींद्र मेहता याच्यावर भादविकलम 324, 323, 352, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.