( चिपळूण / प्रतिनिधी )
रांगोळी आणि हलती काढली असेल. छे शक्य नाही वाटत. अस तुम्हाला वाटत असेल पण हे शक्य आहे. चिपळुणातील संतोष केतकर यांनी चक्क हलती रांगोळी साकारली आहे. एवढच नव्हे तर या रांगोळीची ‘इंडीयन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. अशी रांगोळी प्रथमच काढण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना या रांगोळीचे आकर्षण होते.
चिपळूण येथील नवा कालभैरव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसिद्ध व्हायोलीयन वादक प्रभाकर जोग यांची व्हायोलीयन वाजवतानाची हलती रांगोळी रेखाटली होती. जमिनीवर रांगोळी काढली जाते हे माहीत होत परंतु चक्क हलती रांगोळी काढणं म्हणाजे दिव्य होत. काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने संतोष केतकर यांनी ही रांगोळी साकारायची ठरवलं. तब्बल 14 तासाच्या परिश्रानंतर त्यांनी पद्मश्री प्रभाकर जोग यांची व्हायोलीयन वाजवतानाची रांगाळी पूर्णत्वास नेली. एवढच नव्हे तर ते पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, मिरर रांगोळीही काढतात. एवढी प्रगल्भता त्यांच्यात आहे. त्यांच्या हातून साकारलेल्या रांगोळ्या रसिकांना भुरळ पाडतात. या रांगोळीत प्रभाकर जोग खरोखर व्हायोलिन वाजवत आहेत असे दिसून येत होते. त्यांचा उजवा हात व्हायोलिनवर हलताना दिसत होता. संतोष केतकर हे पेंटिंग व्यवसाय करतात.
चिपळुणातील हलत्या रांगोळीचा व्हिडीओ त्यांनी नोव्हेंबर महिन्यात इंडीयन बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठवला होता. याची दखल घेत इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या या रांगोळीने जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.