(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफेच्या ‘आविष्कार कलागुणांचा’ या होणाऱ्या महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यात आली. यात साहिल मुसाडकर विजयी झाला.
सदर मतदान प्रक्रियेत तृतीय वर्ष कला शाखेचा कु. साहिल गजानन मुसाडकर याने बहुमताने विजय संपादन केला. प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावाच्या साहिलचे भविष्यात आर्मी ऑफिसर बनून देशसेवा करण्याचे ध्येय असल्यानचे तो आवर्जून सांगतो. त्याने राष्ट्रीय स्तरिय ‘आर्मी अटॅचमेंट’ कॅम्प , केरळ येथे झालेला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ राष्ट्रीय कॅम्प, ‘शिवाजी ट्रेलट्रेकिंग नॅशनल कॅम्प’ तसेच अनेक प्रशिक्षणांमध्ये विशेष सहभाग नोंदवला आहे.
जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलेल्या साहिलचे शिक्षण संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ. स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, प्राध्यापक वर्ग तसेच कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.