- देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर : ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.
- स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?
उत्तर : ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.
- देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर : ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .
- शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.
उत्तर : शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण, लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात, त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून.
- एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर : प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.
- गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर : हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून.
- शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर : शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून
- निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?
उत्तर : तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तम तत्व वाढेल. राक्षसी संकटे येतील असे मानले जाते म्हणून.
- देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?
उत्तर : त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून.
- विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?
उत्तर : फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून.
- शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर : शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून. सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन. देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो.शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही. ती हिरण्यगर्भा आहे ती प्रसूति वैराग्य आहे.
- आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर : त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.
- देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.
उत्तर : हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत. अंगठा -आत्मा, तर्जनी -पितर, मध्यमा-स्वतः, अनामिका -देव, करंगळी -ऋषी. म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे.
- समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर : विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून.
- अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.
उत्तर : पितराना दोष लागतो असे मानले जाते म्हणून.
- उंब-यावर बसून का शिंकू नये.
उत्तर : उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्व “तिर्थे” बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून. असे घडल्यास पाणी शिंपडावे.
- निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.
उत्तर : झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून.
- मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.
उत्तर : प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही असे मानले जाते म्हणून.
- रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?
उत्तर : याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून.
- सायंकाळी केर का काढु नये?
उत्तर : लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते व हे अलक्ष्मीला आवडते.
- रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.
उत्तर : शव= शिव म्हणून नमस्कार करावा.
- कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?
उत्तर : पुन्हा येणे घडते… नाहीतर कायमचे जाणे होते…
- एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.
उत्तर : दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो. पंचतत्त्वाचा नाही म्हणून.