(रत्नागिरी)
प. पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सवानिमित्त रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 04.30 वा. जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचे यंदाचे विसावे वर्ष आहे.
प. पू. स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रत्नागिरीकर नागरिकांना अवीट अशी नामस्मरणाची गोडी गात मुखाने ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करीत पहाटेच्या धुंद वातावरणात परमेश्वराचे नाम उच्चारत तसेच ज्ञानदेवांचा हरिपाठ गात पावसला जाण्याचा भक्तीमार्ग वर्षातून एकदा तरी अनुभवावा म्हणजे भक्ती नामाची गोडी काय असते ते या छोट्याश्या वारीत अनुभवता येईल.
चालण्याने आरोग्याची टेस्ट करता येते. आपला धीर / संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही काही चालण्याची स्पर्धा नव्हे पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते.
स्वामी सांगतात नाम घ्या, तेच अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देईल. नामात सर्वकाही आहे. सकाळचे धुके, ती राजिवड्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे कुंद वातावरण, समधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी क्षणभरचा दोनदा विसावा आऽहाऽहा याला विसरू नका. त्यासाठी या छोट्या (मिनी) वारीचा अनुभव घ्या.
साधारणपणे पावस येथे 9.00 वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे, नंतर क्षीण घालवण्यासाठी अल्पोपहार, नंतर ट्रक किंवा तत्सम वाहनाने रत्नागिरी येथे परत. दमल्यामुळे दुपारी विश्रांती घ्यायला मोकळीक कारण हा सर्व कार्यक्रम रविवारी आयोजित केला आहे. सर्व दिवस नामात रहा. सर्वांचा शक्यतो पांढरा ड्रेस असावा, पुरुषांसाठी पांढरी टोपी बरोबर आवश्यक. आवश्यक असल्यास पाणी बाटली आणावी व शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्यासाठीचे बूट/चप्पल घालावेत. आपण येताना आपले नाव, पत्ता व फोन नं. एका छोट्या कागदावर लिहून ते संयोजकांकडे द्यावे.
अधिक माहितीसाठी श्री. राजन पटवर्धन – 9860366991 आणि श्री. अनंत आगाशे – 7083162975 या नंबरवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.