(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या सृजनोत्सव कार्यक्रमाच्या सचिवपदी मनिष नांदगांवकर याची निवड झाली आहे.
सृजनोत्सव २०२२ साठी अस्थायी विद्यार्थी मंडळाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. १५ सदस्याच्या अस्थायी विद्यार्थी मंडळात संस्कृती शेरबाळे, सुखी जागिल, नेहा शिंदे , यशराज चाळके, ऋतुजा राऊत , मनिष नांदगांवकर, भाग्यश्री रेड्डी, प्रथमेश सप्रे, मयुरेश आगरे, प्रांजली धुरत, सचिन खेञी, कृपा केळकर, सेजल मयेकर यांचा समावेश आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, निवडणूक साक्षरता मंडळ प्रमुख सौ. राखी साळगांवकर उपस्थित होत्या.