(नवी दिल्ली)
केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या नव्या संहितेमुळे कामगार आणि कर्मचा-यांना आता अधिक फायदा होणार आहे. या कायद्याचा एक भाग असलेला सामाजिक सुरक्षा कायदाही संमत करण्यात आला असून या सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठा फायदा होणार आहे.
भारतातील बहुतांशी राज्यांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या नव्या कायद्यात कर्मचारी, कामगारांना सामाजिक सुरक्षा, लैंगिक समानता, कल्याणकारी योजनांचा फायदा होणार आहे. भारत सरकारने कामगार क्षेत्राला किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ४ श्रम संहिता पारित केल्या आहेत. या नव्या संहितेत या तीन मुद्यांवर भर देण्यात आला आहे. यात कायमस्वरूपी कामगार आणि कर्मचा-यांप्रमाणेच कंत्राटी कामगार आणि नियमित कर्मचा-यांनाही फायदा होणार आहे. या नव्या संहितेनुसार कामगार आणि कर्मचा-यांना सामाजिक सुरक्षाही मिळणार आहे. तसेच या संहितेत लैंगिक समानता पाळली जाणार आहे. महिलांसाठी कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित आणि उत्तम वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
या असणार सुविधा
-महिलांना मातृत्वात लाभ मिळणार
-बालसंगोपनासाठीच्या सुविधा मिळणार
-रात्रपाळीत काम करणा-यांना लाभदायी
-समान पातळीवर कामाचा मोबदला
-लैंगिक भेदभाव नष्ट करून समानता आणण्याचा प्रयत्न
कल्याणकारी योजनांचा लाभ
-कर्मचारी-कामगार शब्दाच्या व्याख्येत असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश
-कर्मचारी, कामगारांना मिळणार भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्यूएटीचे फायदे
-लहान उद्योग, कंपन्या राज्य कामगार विमा योजनेत येणार
-जोखीम असलेल्या उद्योगांचा ईएसआयमध्ये समावेश
असा मिळणार फायदा
-कर्मचा-यांकडे निवृत्तीवेळी अधिक पैसे राहणार शिल्लक
-कामगार, कर्मचा-यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी जमा झालेले पैसे वाढणार
-नव्या बदलानुसार पीएफ आणि ग्रॅज्यूटीमधील हिस्सा कंपनीला ठरवावा लागणार
-मूळ पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भत्ते असणार नाहीत