फेसबुकने (Facebook) एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे अनेक लोक जोडले जातात. अनेक चांगल्या गोष्टी, पोस्टही या प्लॅटफॉर्मद्वारे शेअर होत असतात. परंतु यावर असलेल्या अनेकांच्या प्रोफाईलद्वारे, एखाद्या व्यक्तीबद्दलची माहितीही मिळवली जाते. Facebook द्वारे मागील काही वर्षांपासून अनेक डेटा लीकची प्रकरणं समोर आली आहेत. एवढंच नाही, तर फेसबुक तुमची दररोजची अॅक्टिव्हिटीही ट्रॅक करण्याचं काम करतो. परंतु Facebook App आणि वेबसाईटमध्ये काही सोप्या स्टेप्स वापरल्यास, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सची अॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकणार नाही.
– Facebook app मॅनेज करण्यासाठी युजरला आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर Setting मध्ये ‘Apps’ वर जावं लागेल.
– नंतर स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल झालेल्या अॅप्सपैकी Facebook App वर जावं लागेल.
– App वर क्लिक करुन परमिशन टॅबवर टॅप करा.
– परमिशन पर्यायात, जर तुम्ही app ला आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेरा, कॅलेंडर, कॉन्टॅक्स इत्यादींपैकी कोणालाही परमिशन दिली असेल, तर ते समजेल.
– तुम्ही app ला देण्यात आलेल्या परमिशन हटवू शकता. त्यानंतर फेसबुक अॅप तुमच्या स्मार्टफोनचा कोणताही डेटा कलेक्ट करू शकणार नाही.
फेसबुक अॅक्टिव्हिटी –
– App मध्ये लॉग-इन केल्यानंतर उजवीकडे असलेल्या तीन लाईनवर टॅप करा आणि स्क्रोल करुन सेटिंगमध्ये जा.
– सेटिंगमध्ये टॅप केल्यानंतर, एक नवी विंडो ओपन होईल, जिथे खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Off-Facebook Activity’ हा पर्याय दिसेल.
– ‘Off-Facebook Activity’ वर टॅप करा. टॅप केल्यानंतर Facebook वर जे काही स्क्रोल होईल, ते दिसेल. ते हटवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या ‘Clear History’ वर टॅप करावं लागेल.
– ‘More Options’ वर क्लिक केल्यानंतर ‘Manage Future Activity’ पर्याय दिसेल.
– यावर टॅप केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. नव्या विंडोमध्ये खालच्या बाजूला पुन्हा ‘Manage Future Activity’ वर क्लिक करावं लागेल.
– नव्या विंडोमध्ये सर्वात आधी Future off facebook activity ला ऑफ करावं लागेल. डिफॉल्टमध्ये हे ऑन असतं.