(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल विद्यामंदिर प्रशालेने जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत यश संपादन केले आहे. 3 डिसेंबर रोजी डेरवण येथे शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा झाल्या. यामध्ये जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी प्रशालेच्या १९ वर्षा खालील मुलींच्या संघाने चिपळूण च्या संघाला हरवून विभागीय स्पर्धेत धडक मारली. कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशाला रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यांतील संघामध्ये जान्हवी राऊत, श्रेया विभुते, श्रद्धा गौंड, श्रावणी जाधव, दिक्षा चव्हाण, पायल पष्ट्ये , अरुंधती भोपळे, गायत्री गद्रे, पूर्वा पाटील, स्वरा गडदे, रिया केदारी, त्रूनिका सावंत, राजलक्ष्मी साळवी, रिद्धी पाटील, अनुष्या सेलवान, गार्गी घणवठ्कर, अस्मी गडदेगडदे आदींचा समावेश आहे.
या यशस्वी खे संघाला शाळेचे क्रिडा शिक्षक रणजित जाधव, मिथिला मोरे, निखिल कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी संघाचे शाळेच्या मुख्याध्यापिका त्रप्ती वराठे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पेद्दना सर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्याच बरोबर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.