(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल विद्या मंदिर प्रशालेचा वार्षिक क्रिडा महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पेद्दणा सर व आकांशा लेडीज क्लब च्या अध्यक्षा राजेश्वरी मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरवात क्रिडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. क्रीडा मंत्री आवेश गुहागरकर याच्या मार्फत शपथ घेण्यात आली. त्याच बरोबर शाळेच्या चार हाऊसनी परेड संचलन केले. वेगवेगळे वैयक्तिक खेळ त्यामध्ये ८००मी. ६०० मी. २०० मी. गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक असे वैयक्तीक खेळ घेण्यात आले. फूट बॉल, क्रिकेट, व्हॉली बॉल, थ्रो बॉल, रस्सी खेच असे सांगिक खेळ घेण्यात आले. चार हाऊसमध्ये समीर हाऊस विजेता राहिला. उपविजेता नीर हाऊस ठरला. सर्व विद्यार्थ्यानी छान प्रकारे या खेळाचा आनंद घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका त्रप्ती वराठे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रिडा विभागाचे रणजित जाधव ,विनोद पिल्लाई, मिथिला मोरे व शाळेच्या विध्यार्थी मंत्री मंडळाने आयोजन केले. अकरावीच्या विद्यार्थ्यानी खेळाचे मैदान आखण्याची जबाबदारी घेतली. त्याच बरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक वृदांचे मोलाचे सहकार्य लाभले.