(खवटी / वार्ताहर)
खेड तालुक्यातील धाकटे मांडवे येथे जागृत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण तसेच वाडीअंतर्गत रस्त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
आमदार म्हणून, विकासकामे करण्याची माझी जबाबदारी आहे आणि त्यात मी कोठेही कमी पडणार नाही. सर्वानी एकत्र येऊन वाडीचा गावचा विकास करुन घ्या, विकास कामे करून जनतेला सोबत घेऊन मला विकास करायचा आहे. विकास कामांची व्याख्या आपल्याला बदलायची आहे. रस्ते पाणी पाखाडी या आपल्या मूलभूत सुविधा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या गावचा विकास करायचा आहे, असे दादांनी ग्रामस्थांना अश्वाशित केले.