( राजापूर / प्रतिनिधी )
तालुक्यातील केळवली येथे ओढयाच्या बाजूला 3 पानी जुगार खेळणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 42 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 30 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवानगर येथील ओढयाच्या बाजूला असलेल्या झाडीझुडुपाच्या आडोशाला 3 पानी पत्त्यांचा पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या ठिकाणी धाड टाकली. यावेळी अजय धोंडू हर्यान (35, केळवली, गवळवाडी, राजापूर), महेश मोतीराम हर्यान (31, केळवली मधलीवाडी, राजापूर), विलास सखाराम रोडे (42, रायपाटण, टक्केवाडी, राजापूर), महेश गंगाधर जोगी (31, मालवण, जि. सिंधुदुर्ग), या चार जणांना ताब्यात घेण्यात आले. तर पसाद चंद्रकांत हर्यान हा पोलिसांना पाहताच पळून गेला.
पोलिसांनी 36 हजार 100 रुपयांची रोख रक्कम, 5 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, 1200 रुपये किंमतीचा छोटा इन्व्हर्टर त्यावर लावण्यात आलेला बल्ब असा एकूण 42 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी 5 जणांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.