( चिपळूण /ओंकार रेळेकर )
घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालय, कोल्हापूर आणि एल. पी. मार्ग. लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने लोटे उद्योग भवन येथे नुकतीच संपन्न झालेल्या स्टॅटिक चार्ज – प्रतिबंध आणि नियंत्रणे या विषयावर् एकदिवसीय प्रशिक्षण पार पडले. सदर प्रशिक्षणाचे उदघाटन श्री. सुरेश जोशी – सह संचालक व श्री. पी. आर. भिंताडे – उप संचालक , औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी मान्यवरांनी घरडा कंपनीच्या पुढाकाराबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले.
नामांकित प्रशिक्षक श्री. अविनाश काळे यांनी लोटे औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यातील जवळपास १५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. कंपन्यात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या सॉल्व्हंटमुळे आग लागण्याचे प्रमाण जास्त असते, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी घरडा कंपनीने सदर प्रशिक्षण प्रायोजित केले होते. प्रशिक्षणाचे आयोजन घरडा कंपनीचे साईट हेड श्री. आर सी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मल्लिकार्जुन मालगत्ते – इ एच एस हेड, घरडा व एल पी मार्ग लोटे यांनी केले.