(नवी दिल्ली)
पुढील वर्षी म्हणजे मार्च 2023 मध्ये होत असलेल्या आयपीएलमध्ये नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आयपीएल २०२३ साठीचा मिनी लिलाव २३ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. एका बाजूला लिलावाची तयारी सुरू असताना बीसीसीआयने स्पर्धेच्या नियमात एक मोठा बदल केला आहे.
आता इंपेक्ट प्लेयर नियमाला मंजूरी देण्यात आली आहे. नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधार ११ ऐवजी १५ खेळाडूंची नावे सांगतील. त्यापैकी ११ खेळाडू हे प्लेइंग ११ मध्ये असतील तर अन्य चार खेळाडू हे सबटीट्यूट असतील. या चार पैकी कोणताही एक खेळाडू मॅच सुरू असताना प्लेइंग ११ मधील कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकेल. संबंधित खेळाडूला गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करता येईल. या नियमानुसार खेळाडू संघाच्या डावाच्या १४व्या ओव्हरपर्यंतच संघाकडून खेळू शकेल. त्यानंतर मात्र असा सबटीट्यूट घेता येणार नाही.