( चिपळूण/ओंकार रेळेकर )
“ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांच्यासाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रभर पोलिसांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या
महाराष्ट्र पोलीस बॉईजसंघटनेच्यावतीने नुकत्याच मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री श्री मंगल प्रभात लोढा, संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले तसेच संघटनेचे कोकण प्रमुख चिपळूण चे सुपुत्र सैफ सुर्वे यांच्या विनंतीला मान देऊन दुबई येथील उद्योगपती डॉ. बु अब्दुल्ला उपस्थित राहिले होते.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा शहिदांना अभिवादन कार्यक्रमाला दुबईमध्ये उद्योगपती डॉ. बु अब्दुल्लायांची उपस्थिती खास चर्चेचा विषय ठरली होती.२६/११ रोजी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये पोलिसांसह शेकडो लोकांना प्राण गमावले लागले होते निधन झालेले पोलीस आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथे शहिदांना अभिवादन या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुलजी दुबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शहिदांना अभिवादन करण्यासाठी संघटनेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणचे सुपुत्र संघटनेचे कोकण प्रमुख चिपळूण मधील सैफ सुर्वे यांच्या विनंतीला मान देऊन संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील सुप्रसिद्ध उद्योगपती, मध्य पूर्व, एशिया आणि देशांच्या इतर भागात २७० पेक्षा जास्त कंपन्यांचे मालक असलेले दुबई येथील उद्योगपती डॉ.बु.अब्दुल्ला हे दुबई वरून खास कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री श्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस कमिशनर विवेक फंसळकर, पोलीस कमिशनर कृष्णा प्रकाश सिंग, पोलीस उपायुक्त हरी बालाजी, एन. जी. जी कमांडो सुनील जोधा अजमेर दर्गा चे अध्यक्ष अमिन् पठाण आणि मुंबई पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फोटो : दुबई येथील उद्योगपती डॉ . बु अब्दुल्ला यांचा सत्कार करताना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख सैफ सुर्वे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)