(रत्नागिरी)
शिवसेनेत फुट पडल्यानंतरही शिवसेना जशी ताकदीने उभी आहे त्याचप्रमाणे युवासेना सुद्धा दिवसेंदिवस जोमाने वाढताना दिसत आहे. गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे युनिट स्थापन करण्यात आल्यानंतर आता फिनोलेक्स कॉलेजमध्ये युनिट स्थापन करून युवासेनेने आपली छाप पाडली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद शेरे यांच्या हस्ते युनिटचा शुभारंभ करण्यात आला. सानिका साळवी हीची फिनोलेक्स कॉलेज युनिटच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रसाद सावंत यांनी पुन्हा एकदा युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर युवासेनेचा झंजावात आणखी दिसू लागला आहे. जुन्याना प्रवाहात आणून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचीही फौज उभारत सावंत यांनी आपली योग्यता त्यांच्या कार्य प्रणालीने सिद्ध केली आहे. भविष्यात सर्व कॉलेजमध्ये युनिट स्थापन करणार असे प्रसाद सावंत यांनी यावेळी सांगितले.
फिनोलेक्स कॉलेज युनिट उद्घाटन प्रसंगी प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शिवसेना विभाग प्रमुख विजय देसाई, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत, शहर प्रमुख आशिष चव्हाण, उपशहर प्रमुख पारस पाटील, कॉलेज युनिट तालुका प्रमुख पारस साखरे, निखिल बने, जयदीप सावंत, रोहित शिंदे यांच्यासह कॉलेज युनिट पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते. युवासेना जिल्हा प्रमुख विनय गांगण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
अध्यक्ष :- सानिका साळवी
उपाध्यक्ष :- अद्वैत साळवी, सेजल सावंत, आयुश कुबडे , ऋतुजा देशमुख.
सचिव :- आराध्य कदम.
सहसचिव :- अंकित जाधव, वेदांत नाईक.
समन्वयक :- अथर्व सुतार , शुभम कोतवडेकर, प्रथमेश सुर्वे , प्रसाद कासार.
सदस्य :- सौरभ साळवी, चिन्मय मोंडकर, अक्षय देसाई, शांभवी सुतार, सुयश त्रिभूवने, स्वराली गादीकर, स्वरूप बाणे, पृथ्वीराज पाटील, अथर्व साळवी, पुंडलिक देसाई, तन्मय पाटील, ओमकार सावंत, वेद रेवाळे, केदार कुवेस्कर.