(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील 75 वर्षीय वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना 28 नोव्हेेंबर रोजी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास घडली. गणपत गोविंद सुटाके (75, सोनवडे, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत सुटाके यांना 25 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा डावा पाय व डावा हात तसेच तोंडाला कमजोरीपणा आल्याने उपचारासाठी संगमेश्वरातील डॉ. मुळये यांच्याकडे दाखवण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी लोटलीकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना 28 नोव्हेंबर रोजी सकाळी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी 7 वा. च्या दरम्याने त्यांचा मृत्यू झाला. देवरुख पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.