(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मारुती मंदिर येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीचे मालक भिमसेन गुरुनाथ रेगे यांच्या मालकीची दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी चोरटयाला कुवारबाव येथे ताब्यात घेतले. सुरज वामन वानखेडे (40, विक्रोळी वेस्ट, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला कुवारबाव येथून दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुचाकी चोरीची फिर्याद दिलीप मांडवकर (58, डाफळेवाडी, फगरवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या पाठीमागील बाजूस बजाज कंपनीची एमएच 08 एएस 4305 सीटी 100 गाडी पार्क केलेली होती. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.15 ते 4.25 या मुदतीत ही दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. ही गाडी शांतादुर्गा गॅस एजन्सीचे मालक भिमसेन गुरुनाथ रेगे यांच्या नावे होती. दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दिलीप मांडवकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी चोरटयावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या चोरीचा तपास करत असतानाच कुवारबाव येथील हेळेकर स्वीट मार्ट समोर सुरज वानखेडे याच्या ताब्यात दिसून आली. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कागदपत्रांची मागणी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. पोलिसांना त्याचा संशय आला. त्याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेले बजाज कंपनीची सीटी 100 दुचाकी ही शांतादुर्गा एजन्सीचे मालक भिमसेन रेगे यांचीच असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सुरज वानखेडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.