Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 45
Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25
गाव करील ते राव काय करील अशी एक म्हण आहे. सगळीकडेच झालेल्या नुकसनामुळे महावितरण तरी कधी आणि कुठे काम करणार? हा मोठा प्रश्न होता. अशावेळी त्यांना दोष न देता अडचण लक्षात घेऊन कोंडसर गावचे गावकरी एकत्र आले.
कोंडसर ग्रामपंचायत सदस्य व भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते प्रताप मुरकर यांनी पुढाकार घेऊन कोणतेही राजकारण न करता लोक सहभागातून एकीचे बळ दाखवत गावात चार दिवसात वीज आणली. याकामी गावकऱ्यांनी पदरमोड करत पोल घालण्यासाठी कातळावर खड्डे काढून घेतले.
मग त्यात अवजड पोल उभे केले. वादळामुळे पडलेल्या तारा पुन्हा जोडून विद्युतप्रवाह सुरळीत केला. महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गावातील युवक वर्गाने याकामी पुढाकार घेऊन 4 दिवसात गावातील अंधाराच साम्राज्य नाहीस केलं.
यामुळे गावात फक्त वीजच आली अस नाही तर आलेल्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची जिद्द देखील निर्माण झालेय अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.