( प्रतिनिधी / रत्नागिरी )
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे दोघांना महागात पडले आहे. जयगड परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्या 2 आरोपींना न्यायालयाने 500 रुपयांचा दंड सुनावला आहे. राकेश कुमार सोनी (33, ऱा मालगुंड, रत्नागिरी) व श्रीकांत विठ्ठल गोरगोन (28, ऱा खंडाळा रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत़.
मालगुंड येथे 22 नोव्हेंबर 2022 रोजी राकेश हा सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू पिताना आढळला होत़ा तर 23 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीकांत सोनी हा खंडाळा येथे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू पिताना पोलिसांना आढळला होत़ा. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केल़े. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पल्लवी शेषगिरी गोवेकर यांनी या खटल्याचा निकाल देत दोन्ही संशयितांना 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावल़ी. सरकारी पक्षाकडून ऍड़ शिल्पा गोताड यांनी युक्तीवाद केला.