भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी कोरोना कालखंडात प्रशासन, मंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार या सर्वांना वेगवेगळ्या प्रश्ना संदर्भात वेगवेगळ्या मागण्या करणारी, परिस्थिती स्पष्टपणे मांडणारी अनेक पत्र लिहिली. या पत्रांचा संकलन करून त्याचा एक पुस्तक ‘पत्र जागर’ स्वरूपात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
त्यावेळी ॲड. पटवर्धनांनी पत्रलेखनाचे वापरलेले अस्त्र अत्यंत प्रभावी आहे, प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी या अस्त्राचा अचूक उपयोग होतो, असं म्हणत ॲड. पटवर्धन यांनी लिहिलेल्या पत्रांचे संकलन करून तयार केलेला ‘पत्र जागर’ कार्यकर्त्यांपर्यंत पोचूदे. जनमत तयार करण्यासाठी याचा उपयोग होईल, असं म्हणत ॲड. पटवर्धन यांना देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ.प्रसाद लाड, आ.रविंद्र चव्हाण, माजी खा.निलेश राणे, माजी आ.बाळ माने यांचेसह अन्य मान्यवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये उपस्थित होते.