दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आता जेमतेम तीन महिनेच शिल्लक आहे. विद्यार्थी अभ्यासाला लागले असताना त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी कठोर नियमावली तयार केली असून कोरोना काळात तसेच गेल्या वर्षी दिलेल्या सर्व सवलती रद्द करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा चांगले मार्क मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा लागणार आहे,
दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षार्थ्यांसाठी कोरोना काळात काही सवलती देण्यात आल्या होत्या. तसेच लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडल्याने त्यांनी परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ देखील देण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनासारखी परिस्थिती नाही. शाळाही वर्याषभर सुरु आहेत. या अनुषंगाने परीक्षा मंडळाने यंदा विद्यार्थ्यांसाठी नियमित नियमावली जारी केली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
कशी असेल नियमावली
– प्रत्येक विषयाच्या परीक्षेआधी किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा कक्षामध्ये उपस्थित राहायचे आहे.
– पहिल्या सत्रातील पेपरसाठी सकाळी साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात सोडण्यात येणार नाही.
– अभ्यासक्रम कपात, वाढीव वेळ या सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत.
– शाळा तिथे परीक्षा केंद्र न ठेवता आता जवळच्या शाळेतल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.