(ज्ञान भांडार)
नेहमी आपण पक्षांना विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसलेले पाहत असतो. लहानग्यापासून ते अबाल वृद्धापर्यंत प्रत्येकाला असे तारेवर बसलेले पक्षी पाहताच प्रश्न पडत असतो की, हे पक्षी असे का बसतात. या पक्षांना तारेवर बसलेले पाहून आपण त्याला तारेवर पक्षांची शाळा भरते असे अनेकदा आपण म्हणतो. इतक नव्हे तर लहानग्यांनादेखील मोठ्या व्यक्ती तसेच सांगत असतात. पक्षांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या अमेरीकेतील Audubon Vermont या संस्थेच्या व्यवस्थापक मार्क ला बार यांनी म्हटले आहे की, पक्षी तारेवर बसण्याचे कारण अनेक आहेत. पहिले कारण असे की, शिकार करणारे पक्षी तारेवर बसुन झाडांवर बसलेल्या इतर पक्षांवर नजर ठेवत असतात. दुसरे कारण म्हणजे स्थलांतरित होण्यापूर्वी तारेवर पक्षी एकत्र येतात. खरंतर उन्हाळा संपल्यानंतर हिवाळा ऋुतू सुरू होण्यापूर्वी अधिक पक्षी तारेवर बसलेले पाहायला मिळतात. काही वेळा पक्षी जोडीदार निवडण्यासाठी तारेवर बसतात. अनेक वेळा नर पक्षी मादेला आकर्षित करण्यासाठी तारेवर बसून आवाजाद्वारे प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. त्या अर्थाने तार ही पक्षांसाठी कपल्स पॉईंट ठरतात असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे कधी पक्षांना तारेवर बसल्याचे पाहिल्यानंतर असे गृहित धरू नका की, ते बिनकामाचे बसले आहेत.
जीवनामध्ये आपल्या आसपास अनेक अशा गोष्टी घडत असतात किंवा आपण त्या गोष्टी उघड्या डोळ्याने पाहत असतो तरीही बहुतेक वेळा त्यांचेकडे कानाडोळा करत असतो. अनेक गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये कुतुहूल असते परंतु आपण ते जाणून घेण्यास पुढे सरसावत नाही. जेव्हा आपण पक्षांना विजेच्या तारांवर बसलेले पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या पक्षांना शॉक लागतो की नाही.
तर आपण सारे रोजच पाहत असाल की घरासमोर किंवा अन्य ठिकाणी बहुतेक संख्यांमध्ये पक्षी विजेच्या तारांवर बसलेले असतात. आपल्याला माहिती असलेल्या प्रत्येक वस्तूचे कार्य करण्याचे स्वतःचे असे काही विशिष्ट नियम असतात आणि त्या नियमांवर ते कार्य करत असते. आपल्याला हे माहिती असेल की, इलेक्ट्रॉन ताऱ्याच्या सहाय्याने पुढे सरकतात आणि त्यांची गती वाढते आणि आपल्या घराच्या आत करंटच्या स्वरूपात पोहचतात. काही लोक आपल्या घरांमध्ये एक अर्थिंग तार लावून ठेवतात तसेच अशा पद्धतीने एक पुर्ण सर्किट पूर्ण झाल्यावर बल्ब जळतो आणि पंखे इत्यादी सुरू होतात.
पक्ष्यांनाही विद्युत धक्का बसतो. सामान्यत: आपण पक्षी जिवंत विद्युत तारांवर बसलेले नेहमी पाहतो. पण, यावरून त्यांना विद्युत धक्का बसत नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. जोपर्यंत विद्युत मंडळ पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठल्याच जिवाला विद्युत धक्का बसत नाही. तारांमधील विद्युत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जोपर्यंत आपल्या शरीरात शिरून जमिनीत जात नाही, तोपर्यंत आपल्या शरीराला कुठलीच इजा होत नाही. परंतु, अर्थिंग मिळताच विद्युत मंडळ पूर्ण होते आणि जोरदार धक्का बसतो. पक्ष्यांचा केवळ विद्युत तारांशी संबंध येतो. या विद्युत तारांखाली असलेल्या अर्थिंगशी संबंध येत नाही.
एक कारण हे सुद्धा आहे की, चिमणी एका सोबतच जमीन आणि तार यांच्या संपर्कात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांना शॉक बसू शकणार नाही. जमिनीशी संपर्क झाल्यावर अर्थिंग त्यामुळे सर्किट पूर्ण होऊन जाते, तसेच त्यांच्या शरीरातून विजेचा प्रवाह होत असतो. हीच गोष्ट मनुष्याच्या बाबतीत सुद्धा घडत असते. जेव्हा कधी तो विजेच्या तारेला स्पर्श करतो आणि त्याचे पाऊल जमिनीवर असते तेव्हा हे सर्किट पूर्ण झाल्यामुळे मनुष्याला शॉक बसतो.
विजेच्या तारांमध्ये अनेक इलेक्ट्रॉन्स असतात. जे एका जागेवरून दुसर्या जागेवर गतिमान होत असतात. केव्हाही हे इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसर्या जागेवर जातात तेव्हा या तारेमध्ये विजेचा प्रवाह निर्माण होतो. विजेच्या प्रवाहाचे दोन मार्ग आहेत, तेव्हा नेहमी त्या मार्गाने प्रवाहित होईल जेथे कोणताच अवरोध नसणार जेव्हा विजेचा प्रवाह असतो तो तांबे या धातूशी असतो. तज्ञांच्या मते, पक्ष्यांच्या शरीराची कोशिका आणि ऊती, तांब्याच्या तारेच्या तुलनेत अधिक प्रतिरोध निर्माण करतात.