आपल्या घरात पुढीलप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम पाळा, घरात नक्कीच सुखशांती लाभेल.
नवीन फ्लॅट विकत घेताना फक्त फ्लॅट किंवा इमारत पाहु नये. इमारती पासुन १०० ते ५०० फुटाच्या परीसरामध्ये कोणकोणत्या सकारात्मक व नकारात्मक अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे डोंगर, मंदिर, हॉस्पिटल, स्मशान, चर्च, गुरुद्वार, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंगल कार्यालय आणि अतिशय गजबजणारी ठिकाणे या गोष्टी आहेत किंवा नाही हे सुद्धा पाहुन फ्लॅट घेण्याचे ठरवावे. घरातील व बाहेरील उर्जांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे वास्तु तज्ञाच्या सल्याने घर विकत घ्यावे.
आपल्या घराची दक्षिण व पश्चिम दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा. ही घरामध्ये स्थिरता, दिर्घ आयुष्य, धनवृद्धी आणि आयुष्यातील सर्व सुख व आनंद देणारी दिशा आहे. याठिकाणी टॉयलेट, अंडर ग्राउंड, पाण्याची टाकी बोअरिंग, विहीर, तळे जमिनीतील पाण्याची टाकी अशा कोणत्याही गोष्टी येवु देवु नये. त्यामुळे विविध प्रकारच्या समस्या घरामध्ये निर्माण होऊ शकतात. योग्य वास्तु तज्ञाच्या सल्याने घर वास्तुशास्त्रा नुसार करून घ्यावे.
मुलांना घराच्या पश्चिम दिशेला म्हणजेच पुर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे. त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत बंद पडलेल्या तुटलेल्या – फुटलेल्या, अडगळ भंगार वस्तु ठेवु नये. अभ्यासाची खोली प्रसन्न, आरामदायक व स्वच्छ ठेवावी. मुलांची मानसिकता बिघडणार नाही याची काळजी घरामध्ये नक्की घ्यावी. त्यामुळे घरामध्ये प्रसन्न व आनंददायी वातावरण राहील व मुलांचा अभ्यास देखील चांगला होईल.
मुलांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष याचे वाचन करावे, गणपती नामस्मरण करावे मुलांनी रोज प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचावे आणि पुर्व दिशेला तोंड करून अभ्यासाला बसावे. रात्री झोपताना पुर्वेला डोके व पश्चिमेला पाय करून झोपावे व परीक्षेच्या कालावधी मध्ये कोणत्याही पद्धतीचे वादविवाद होणार नाही घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी.
आपल्या घराच्या आणि दुकानाच्या साउथ – वेस्ट म्हणजेच नैऋत्य दिशेला तिजोरी किंवा पैसे ठेवायचे कपाट नसेल तर त्या ठिकाणी पैसे किंवा नोटांचे पोस्टर, पेटिंग, फ्रेम केलेले चित्र उत्तरेला तोंड करून लावावे. नैऋत्य दिशा ही धन टिकवणारी दिशा असल्यामुळे घरामध्ये पैसे टिकायला सुरवात होते. म्हणुन नैऋत्य दिशेला जड वस्तु व पैशाचे पोस्टर लावावे.
कोणतीही वास्तु विकत घेताना खड्यामध्ये असणारी वास्तु विकत घेवु नये जमिनीला समांतर आणि रस्त्यापेक्षा उंच असणारी वास्तु लाभदायक ठरते. ऑफिस, दुकान, घर, हॉटेल, इंडस्ट्री, फार्म हाउस या सगळ्यांसाठी खड्यातील जागा, बेसमेंटमधील किंवा खड्यामधील उतरती जागा विकत घेणे किंवा भाड्याने घेणे टाळावे त्यामुळे खड्यामधील जागेत व्यवसाय सुरु केल्यामुळे यश मिळणे कठीण जाते व सर्व प्रकारच्या समस्यांनी व्यवसाय अडचणीत येऊ शकतो.
प्लॉट विकत घेताना विदिशा म्हणजेच क्रॉस डायरेक्शन असणारा प्लॉट विकत घेवु नये त्यामुळे मूळ दिशा किंवा उपदिशांना कॉर्नर कट येतो आणि दिशांची शुभ ऊर्जा घराला मिळत नाही. बांधकाम केले तरी दिशांचे गुण, दिशांची ऊर्जा घराला लाभत नाही त्यामुळे शेती, प्लॉट, फ्लॅट विकत घेताना ९० अंशा मध्ये उत्तर किंवा पुर्व दिशा पाहुन वास्तु तज्ञाच्या सल्याने सुयोग्य अशी वास्तु विकत घ्यावी. त्यामुळे कायम स्वरूपी सुख – समृद्धी मिळते.
वास्तु पॉझिटीव्ह तर लाइफ पॉझिटीव्ह शरीराची आणि घराची वास्तु शुद्ध, सात्विक आणि उत्तम संस्कारासहित आपण सुयोग्य ठेवली तर आपले आयुष्य पॉझिटीव्ह होते. कामातील अडथळे दुर होतात यश सदैव मिळत जाते आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती व उत्तम आरोग्य याचा लाभ आपल्याला व आपल्या कुटुंबियांना सदैव मिळत जातो.
वास्तु विक्री होत नसेल, नवीन वास्तु खरेदी करण्याचा योग येत नसेल, नवीन घर किंवा बांधकाम सुरु होत नसेल तर गणपतीची उपासना नेहमी करावी. मंगळवारचा उपवास करावा ‘ओम अंगारकाय नमः’ हा जप मंगळवारी १०८ वेळा करावा गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन लाल फुल वहावे. ‘तुझ्या कृपेने वास्तुचा लाभ लवकरात लवकर होत आहे’ अशी २१ वेळा प्रार्थना करावी यामुळे गणपतीच्या कृपेने गुण लवकर येतो.
सकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामधील स्वयंपाक घर, बेडरूम, हॉल यांची दारे – खिडक्या सकाळच्या वेळेमध्ये उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे संध्याकाळ पासुन सकाळपर्यंत म्हणजे १४ तास घरामध्ये कोंडटलेली दुषित हवा, अशुद्ध ऊर्जा ही घराच्या बाहेर पडते. घरामध्ये सकाळच्या वेळेमधील शुद्ध हवेतील प्राणवायु, प्राणशक्ती आपल्याल्या आणि आपल्या घराला मिळते. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते. सकाळच्या वेळेमध्ये घरातील सर्व दारे – खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
घराचा मुख्य दरवाजा, बेडरूम, बाथरूम यांच्या बिजागिरीतुन आवाज येत असेल किंवा घरातील पंखा, बसण्याचे टेबल, खुर्ची यातुन करकर आवाज येत असेल तर हा आवाज घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार करतो. चिड – चिड निर्माण करतो व वादविवाद उद्भवतो त्यामुळे घरातील अशा कोणत्याही वस्तु मधुन आवाज येवु देवु नये त्यामुळे घरामध्ये सुख – समृद्धी शांतता राहते.
कारखाना, घर, दुकान, बंगलोसाठी प्लॉट विकत घेताना आयताकृती, चौकोनी आकाराचा प्लॉट विकत घ्यावा आणि प्लॉट विकत घेताना प्लॉटची लांबी दक्षिण आणि उत्तर लांबीची वाढ असलेला प्लॉट विकत घ्यावा. पुर्व – पश्चिम लांबीच्या प्लॉट वर दक्षिण दिशेचा वाईट ऊर्जेचा जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तु तील शुभ ऊर्जेची हानी होऊ शकते म्हणुन कोणत्याही प्रकारचा प्लॉट, शेती किंवा मोकळी जागा विकत घेताना वास्तु तज्ञाच्या सल्याने वास्तु व्हिझिट करून प्लॉट विकत घ्यावा म्हणजेच ती वास्तु लाभते.
कारखाना, बंगलो, फ्लॅट ची स्किम, प्लॉटिंग, इंडस्ट्री उभा करणे अशा प्रकारच्या कोणत्याही बांधकामासाठी प्लॉट विकत घेण्या आदी तज्ञाकडून सॉइल टेस्टिंग म्हणजेच माती परीक्षण करून घेणे महत्वाचे आहे. भरपुर काळी अशी माती असलेली शेत जमिनीमध्ये बांधकामासाठी पाया १० ते १५ फुटापर्यंत लवकर लागत नाही. मातकट, भुरकट थोडीशी लालसर अशी जमीन असेल तर बांधकामासाठीचा पाया ५ ते ६ फुटावरती मिळतो. मुरमाड डार्क ब्राऊन आणि दगड गोटे, पाषाण, सदृश अशी जमीन असेल तर पाया १ ते २ फुटावरती लागतो. यावरती केलेले बांधकाम भक्कम व टिकाऊ होते.
घराची बाल्कनी, टेरेस घराच्या आत घेताना किंवा क्लोज करताना ईशान्य, उत्तर, पुर्व आणि आग्नेय अशा दिशामधील टेरेस, बाल्कनी शक्यतो क्लोज करू नये यातुन येणारा शुभ प्रकाश रोखला जाऊ शकतो. त्यामुळे घरामध्ये येणारी शुभ ऊर्जा कायम स्वरूपी बंद होऊ शकते. नकारात्मक उर्जेचा प्रवाह घरामध्ये वाढुन विविध प्रकारचे त्रास उत्त्पन्न होऊ शकतात. दक्षिण, पश्चिम, नैऋत्य दिशेची बाल्कनी क्लोज करणे हे वास्तुच्या दृष्टीने हितकारक राहते.
नवीन घरामध्ये फर्निचर ची रचना करताना मुलांची बेडरूम पुर्व, ईशान्य, उत्तर अथवा वायव्येला करावी झोपताना पाय पश्चिमेला आणि डोके पुर्वेला करावे. मुलांची शैक्षणिक प्रगती, आरोग्य, उत्साह आणि खेळाडु वृत्ती चांगली राहते आणि मुलांचा उत्कर्ष चांगला होतो.
महिलांना आरोग्याच्या समस्या, ताण – तणाव, नैराश्य अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये असणाऱ्या तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात.