( रत्नागिरी / प्रतिनिधी )
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पक्ष कार्यासाठी रत्नागिरीत येवून गेल्या. यावेळी त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरीत येवून केला. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी त्या रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात जावून देवदर्शन करून आल्या आणि व्टीटरवरुन “स्वातंत्रवीर सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात जावून मूर्ती पूजा केली.” अशा आशयाचे धादांत खोटे व्टीट केले. याचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विभाग व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हारीस शेकासन, रमेश शाह, मिलिंद कीर, श्रीमती रुपाली सावंत, अॅडव्होकेट अश्विनी आगाशे, राजन शेट्ये, बंडू सावंत, काका तोडणकर उपस्थित होते.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, “२४ फेब्रुवारी १९६३१ रोजी दानशूर भक्ती भूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने देशवीर सावरकर यांनी केलेल्या विनंतीवरुन हे पतितपावन मंदिर बांधून हिंदू धर्मियांना खुले केले आणि भागेश्वर चरणी अर्पण केले. अशा आशयाचा शिलालेख पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लिहीला गेला असताना सुध्दा हा खरा इतिहास न वाचता चित्राताई वाघ यांनी व त्यांच्या पक्षाने दिलेला होमवर्क व्दीटर वरून मांडला आणि स्वत:च्या अज्ञानाची मुक्ताफळे उधळली. इतिहासाची मोडतोड करुन खोटा इतिहास पसरवून लोकांच्या भावना दुखविण्याचे काम चित्राताई वाघ यांनी केले आहे. याबाबत आम्ही त्यांच्या विरुध्द गुनहा दाखल करण्याचा सुध्दा विचार करीत आहोत.
भागोजीशेठ कीर यांचे कार्य हे महान असून त्यांची तुलना कुठेही आणि कुणाशीही होवू शकत नाही. त्यांनी मुंबईमध्ये स्वःखर्चाने९ एकर भूखंड विकत घेवून सरकारला हिंदू स्मशानभूमीसाठी दान केली. अनेक शाळा, देवळे, गोशाळा, धर्मशाळा, पाणवठे, विहीरी बांधून समाजाला दान केल्या. उभ्या महाराष्ट्रामध्ये असा आधुनिक कर्ण आजतागायत जन्माला आली नाही. मुंबईत सरकारला दान केलेल्या जागेची आजचे मूल्य ४ हजार कोटी पेक्षा जास्त आहे.
त्यामुळे भागोजी शेठ कीर यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हिंदू महासभेने पतीतपावन मंदिरात भागोजीशेठ कीर यांच्या हयातीतच भागोजीशेठ कीरांचा पुतळा मध्यभागी उभारला (त्या ठिकाणी सावरकरजींचा पुतळा हिंदू महासभेने का नाही उभारला.)
त्यामुळे चित्राताईंनी भागोजीशेठ कीर यांचे कार्य नष्ट करून सावरकरजींच्या नावावर खपवू नये त्यांच्या पक्षाकडे जर खरा इतिहास असेल तर सावरकरजींनी अशा समाज कल्याण रूपी एकतरी पाणवठा जरी बांधून दिला असेल तर तो जनतेला दाखवून द्यावा अन्यथा माफी मागावी
देशाच्या स्वातंत्र्य लढयात कणभरही योगदान नसलेल्या भाजपा पक्षाचा इतिहास बदलण्याचे काम यापुढे चित्राताई वाघ यांनी करू नये. कोणतेही विधान करताना त्याचा पूर्वअभ्यास करूनच इतिहास सांगावा. अन्यथा नाईलाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. असे त्यांनी म्हटले आहे.