(ठाणे / उदय दणदणे)
मंदिरात देवांना तर घरात आईबाबांना पुजावं इतका आदर मुलांना असला पाहिजे अशा विविध विषयांवर भाष्य करणारी नाट्यकलाकृती यशवंत माणके लिखित -दिग्दर्शित: हेच माझे दैवत” शुभारंभ प्रयोगाला रसिकांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री पाणबुडी प्रस्तुत – श्रेयांस आणि देवांश एंटरटेनमेंट श्री संजय आगिवले व श्री रमेश भेकरे निर्मित/आयोजित व यशवंत माणके लिखित -दिग्दर्शित : “हेच माझे दैवत” नाटकाचा शुभारंभ प्रयोग व पुस्तक प्रकाश सोहळा नुकतंच शनिवार दिनांक-२६ नोव्हेंबर २०२२ रोजी दामोदर नाट्यगृह परळ -मुबंई येथे बहुसंख्य नाट्य रसिकांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
आपल्या मायभूमीतील कलाकार ,खेळाडू उदयास यावे यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे कलाप्रेमी व्यक्तीमत्व गुहागर तालुका सुपुत्र तसेच सामजिक कार्यकर्ते संजय आगिवले आणि त्यांचे सहकारी उत्तम क्रिकेट खेळाडू व नाट्य कलाकार रमेश भेकरे यांच्या अथांग प्रयत्नातून यशवंत माणके लिखित/ दिग्दर्शित – हेच माझे दैवत” या नाटकाची निर्मिती करून नाट्यकलाकृतीत नवनवीन कलाकारांना संधी देत शुभारंभ प्रयोग नियोजनबद्ध आयोजनात पार पडला.
मंदिरात देवांना तर घरात आईबाबांना पूजावं इतका आदर समाजात असला पाहिजे. परिस्थितीपुढे हतबल, प्रेम आणि आयुष्याची जोडीदार, लाचारीचं जगणं,अनिष्ठ रुढी परंपरा अशा विविध पैलूंवर भाष्य करणारी यशवंत माणके लिखित -दिग्दर्शित व अभिनित “हेच माझे दैवत” नाट्यकलाकृतीच्या शुभारंभ प्रयोगालाच रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाटने कलाकारांच स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
लेखक -दिग्दर्शक: यशवंत माणके यांच्या सह सुरेखा बारे, सुनील डिंगणकर, विशाल डावल, रोहिणी पानगले, प्रशांत पाष्टे, दिनेश दवंडे, रमेश भेकरे, आश्विनी धावडे, निलेश चांदीवडे, निलेश तांबे, रवींद्र गांगरकर या सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाने भूमिकेला न्याय देत रसिकांनाची मने जिंकली. “हेच माझे दैवत” नाट्यपुस्तकाचे प्रकाशन व शुभारंभ प्रयोगाला प्रमुख मान्यवर- रविंद्र मटकर (अध्यक्ष- नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र -अखंड भारत) तुषार पंदेरे, सचिन धुमक, उमेश पोटले , विनोद फटकरे, संदिप कानसे, सुभाष बांबरकर, झराजी वीर, उदय दणदणे, प्रदीप मोगरे, रमेश कोकमकर, विलास भेकरे, बाबाजी आगिवले, सुभाष भेकरे, वसंत कावणकर, वामन गमरे (रंगभूषाकार) संतोष घाणेकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार दिपक कारकर यांनी केले. तीर्थे जणू ही चार पाऊले ! उणी पुढ ती देव देऊळे !! जरी चाललो फिरवुनी पाठ!तरी हृदयाच्या राऊळात!! वंदनीय ते भजन नित्य! हेच माझे दैवत, हेच माझे दैवत!! अशा हृदयस्पर्शी पार्श्वगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.