( चिपळूण / ओंकार रेळेकर)
डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चिपळूण यांच्या वतीने स्वच्छता मोहिमेत एक पाऊल पुढे टाकत रविवारी चिपळूण मध्ये श्री सदस्यांनी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.स्वच्छता अभियान सेवेत चिपळूण मधील एकूण १४५ श्री सदस्य रस्त्यावर उतरले होते ,दोन डंपर्, ग्रास कटरच्या सहाय्याने ३ टन सुखा कचरा २.३ टन ओला कचरा जमा करून पालिकेच्या कचरा डेपो कडे टाकण्यात आला.चिंचनाक ते पॉवर हाऊस आणि चिपळूण अर्बन बँक ते भेंडी नाका पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
समर्थ बैठकीतून संपूर्ण जगाला आध्यात्मिक मार्गाने शांततेचा संदेश देणारे आदरणीय स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पुढे सुरू असलेल्या श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने जेष्ठ निरुपणकार आदरणीय पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या आज्ञेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाणारी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. या करीता चिपळूण वासियांकरिता स्वच्छतेच्या मोहिमेत श्री सदस्यांनीं
सहभागी होऊन महत्वपूर्ण योगदान दिले आहे. रविवारी सकाळी ७.३० ते स .१० वा पर्यंत झालेल्या या स्वच्छता मोहिमेची सुरवात चिंचनाका येथून झाली चिपळूण मध्ये रविवारी राबविण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या मोहिमे बाबत चिपळूण शहरातील व्यापारी,आणि नागरिकांनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी धर्माधिकारी यांच्या शिकवणी बद्दल आदर व्यक्त करून समाधान व्यक्त करीत श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांचे आभार मानले आहेत.या पूर्वीही २०१९ मध्ये सांगली, कोल्हापूर, कोकण विभाग येथे आलेल्या महापुरात आणि २०२१ मधे खेड, चिपळूणमध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरात श्री सदस्यांनी मोठे स्वच्छतेचे सेवाकार्य केले होते,शिवाय केरळ येथे आलेल्या महाप्रलंयकारी पुराच्या संकटात यथोचित आर्थिक सहकार्यही करण्यात आले होते.