(मुंबई)
भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले आधार कार्ड आता सुरक्षित राहिलेले नाही. कारण मुंबई पोलिसांनी करोडो नागरिकांचा आधार डेटा चोरी करणा-या दोन भावांना अटक केली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये राहत असलेल्या कोट्यावरी नागरिकांचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
डेटा चोरणारे आरोपी निखिल एलीगट्टी आणि राहुल एलीगट्टी या दोन भावांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. दहापेक्षा अधिक लॅपटॉप, दोन मोबाईल आणि तीन पेक्षा अधिक सिम कार्ड, त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रँच मागच्या दोन महिन्यांपासून मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होते. दरम्यान ही कारवाई काल गुरुवारी करण्यात आली. दोन भाऊ महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील रहिवाशांचा वैयक्तिक डेटा कवडीमोल भावात पुरवत होते. दरम्यान याप्रकरणी मागच्या दोन महिन्यांपासून पाळत ठेवून त्यांच्यावर पुराव्यासह कारवाई करण्यात आली आहे. हा डेटा मुख्यत्वे कर्ज वसुली एजंटना महिन्याला दोन हजार देण्याच्या अटीवर देण्यात येणार होता अशी माहिती पोलिसांनी त्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, याप्रकरणी त्यांनी एक पोर्टल तयार केले होते. त्या पोर्टलवर त्यांनी आपले नाव टाकल्यास सगळी माहिती यामध्ये उपलब्ध होती. दरम्यान ही प्रकार मुलुंडमध्ये राहणा-या राहुल एलिगट्टी आणि निखिल एलिगट्टी या दोन्ही भावांनीच केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान या दोन भावांमध्ये निखीलचा कोरोना काळात जॉब गेल्याने तो वेबसाईट हॅक करण्याचे काम करत होता. दरम्यान भावांनी मिळून काही सरकारी वेबसाइट हॅक केल्या होत्या. तसेच त्यानी काही संवेदनशील डेटा ही चोरी केला होता का हे शोधण्यासाठी पोलिस दोघांची कसून चौकशी करत आहोत.