(रत्नागिरी / प्रतिनिधी)
१४ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, नेताजी सुभाष पथ, मुंबई यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वाद्यसंगीत स्पर्धेत ९ वी ते १२ वी गटात तबलावादनात हर्ष याने द्वितीय क्रमांक पटकावला.
रत्नागिरीचे सुपुत्र मुंबईमध्ये वास्तव्यास असलेले संगीतसंयोजक, संगीतकार, मराठी-हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सुप्रसिद्ध रीदम आर्टिस्ट विजय शिवलकर यांचा हर्ष हा सुपुत्र आहे. तो सध्या वल्लभ इंग्लिश मीडियम स्कूल, माटुंगा (मुंबई) मध्ये शालेय शिक्षण घेत आहे. त्याला बालपणापासून संगीताची आवड असल्याने सर्व प्रकारची तालवाद्य, तबला, ढोलक, कोंगो, बोन्जो, तुंबा, ड्रम, डुग्गी, मादल, साईड रीदम इत्यादी वाद्य शिवाय पाश्चात्य वाद्यसंगीताचे धडे, वेस्टर्न नोटेशन इत्यादी शिक्षण वडील विजय शिवलकर यांनी यांच्यासह (कै.) मारोतीराव कीर व अन्य दिग्गज गुरूजनांकडून मिळाले.
तसेच हर्ष हा हे शिक्षण आपले वडील विजय शिवलकर यांच्याकडून घेत आहे. त्यांनी मिळवलेल्या या संगीत क्षेत्रातील यशाबद्दल तो शिकत असलेल्या शाळेतील विद्यार्थी, मित्र, शिक्षक तसेच आपले मूळ गाव मांडवी, रत्नागिरीमधील सर्व नातेवाईक, मांडवीमधील रहिवासी हितचिंतक या सर्वांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.