(नवी दिल्ली)
पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारताच लष्कर सज्ज झाल आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत एक वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.
भारताच्या उत्तरेला गिलगिट बाल्टिस्तान आहे. स्वातंत्र्यानंतर याच प्रदेशावर पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांनी ताबा मिळवला. तेव्हापासून हा भाग पाकिस्तानकडे आहे. या प्रदेशावर भारताकडून दावा केला जात आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानही या प्रदेशावर आपला दावा करत आहे. त्यामुळे हा भाग मिळवण्यासाठी जर आदेश दिला तर भारतीय लष्कर तो भाग ताब्यात घेण्यास सज्ज आहे.
पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
जम्मू काश्मीरचा उत्तरेकडील भाग असलेला गिलगिट बाल्टिस्तान हा भाग सध्या पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हा भाग भारतात सामील झाला होता. पण पाकिस्तानने या भागात घुसखोर आणि लष्कर घुसवले आणि गिलगिट बाल्टिस्तानचा भाग बळकावला. यावेळी पाकिस्तानचे लष्कर श्रीनगरपर्यंत पोहोचलं होतं. पण भारतीय लष्कराने त्यांना मागे सारलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांने या ठिकाणी युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आली. तेव्हापासून पाकिस्तानने या भागावर आपला दावा सांगितला आहे. मात्र आता भारत तो भाग ताब्यात घेण्यास सज्ज आहे.