(करिअर)
नोकरी नसलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटरने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 164 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. टाटा मेमोरियल सेंटरने (TMC) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), परिचारिका, संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी आणि अशा इतर पदांसह 164 विविध जांगांवर भरतीसाठी अधिसूचना (TMC Recruitment Notification) प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत पात्रतेनुसा (TMC Job Notification) आणि पदांप्रमाणे या भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकतात.
या भरती प्रक्रियेअंतर्गत (TMC Vacancy Details) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 12 जागा, टेक्निकल अधिकारी 02 जागा, टेक्निकल कॉर्डिनेटर (डेटा) 01 जागा, टेक्निकल कॉर्डिनेटर (मेडिकल) 01 जागा, डेटा एंट्री ऑपरेटर 38 जागा, फील्ड इनव्हेस्टिगेटर 02 जागा, रिसर्च असिस्टंट 01 जागा, डेटा एंट्री ऑपरेटर 01 जागा, नर्स 24 जागा, पॅसेंट असिस्टंट 38 जागा, फार्मासिस्ट 06 जागा आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी 38 जागा भरण्यात येणार आहे.
या पदांवर भरतीसाठी 10वी/ 12वी/ बी.फार्मा/ ग्रॅज्युएशन/ बीडीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ एमडीएस/ आयुष/ एमपीएच/ एमडीएससह अतिरिक्त पात्रतेसह आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अधिसूचनेत दिलेल्या या पदांसाठी अर्ज करू शकतात. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याला अधिसूचनेत दिल्याप्रमाणे संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अर्ज कसा करावा, पगार काय असेल यासह वयोमर्यादा, आवश्यक पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलासाठी या https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=18372 लिंकवर क्लि करु शकता.
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिसूचनेवर दिलेल्या पदांनुसार वेळापत्रकानुसार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत पुढील चर्चेसाठी उपस्थित राहू शकतात. जाहिरात बघण्यासाठी थेट लिंक येथे https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=18372 दिलेली आहे. या लिंकवर करून तुम्ही भरती संदर्भातील इतर तपशील पाहू शकता.