(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे एसटी बसला समोरून धडक देणाऱ्या ट्रकचालकाविरूद्ध ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. गणेश अशोक लोंढे (33, ऱा वाळवा सांगली) असे संशयिताचे नाव आह़े. अपघाताची घटना शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली होत़ी. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाह़ी.
एसटी बसचालक महादेव अरूण लिपटे (34, ऱा चिपळूण एसटी डेपो) यांनी अपघातप्रकरणी तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार लिपटे हे 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी एसटी बस (एमएच 14 बीएल 1734) घेवून चिपळूण ते रत्नागिरी असे येत होत़े. सकाळी 6च्या सुमारास हातखंबा येथे लोंढे यांच्या ताब्यातील मालवाहू ट्रकने एसटी बसला उजव्या बाजूला धडक दिली, अशी तकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत ट्रकचालक लोंढे याच्याविरूद्ध भादंवि कलम 279 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा.