( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी येथील एसटी वर्कशॉमध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये 3 एप्रिल 2018 रोजी वाद झाला होता. अमोल श्रीधर जाधव (44, ऱा करबुडे कपिलवस्तूनगर) आणि सहकारी कर्मचारी अरूण सोनू आखाडे (45, ऱा एसटी कॉलनी, माळनाका) याच्यात डिपार्टमेंटमध्ये बॉक्स नेण्यावरून वाद झाल़ा होता. अमोल जाधव याने अरूण आखाडे याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होत़ा. पोलिसांनी अमोल जाधव याच्याविरूद्ध भादवि कलम 324 व 323 नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच या गुह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.
न्यायालयापुढे तक्रारदार अरूण याने सांगितले की, आपल्याला झालेली दुखापत ही मारहाणीतून झाली नव्हत़ी तर आपण काम करत असलेली जागा ही अडगळीची असल्याने त्याठिकाणी पडल्याने आपल्याला दुखापत झाल़ी. तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केलेली तक्रार ही आपल्याकडून गैरसमजातून झाली होत़ी आता आपली आरोपीविरूद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे अरूण याने न्यायालयापुढे सांगितल़े. तक्रारदारानेच मारहाण केल्याचे नाकबूल केल्याने आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल़ी. न्यायालयाने अमोल जाधव याची निर्दोष मुक्तता केल़ी. या खटल्याचा निकाल रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे दिला.