( रत्नागिरी / प्रतिनिधी )
खेड येथील भरणे गवळवाडी स्टॉप येथे इर्टिगा कार आणि टेम्पो यांच्यात १८ नोव्हेंबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात दोघेजण जखमी झाले होते. अनंत सखाराम गवळी (६८, रा. कनकाडी, संगमेश्वर), लक्ष्मण सखाराम महाडिक (५६, इर्टिगा चालक) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघातात इटिंगा गाडीचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातप्रकरणी टेम्पो चालक महेश दिनकर चव्हाण (३२, पाडळी, कराड, सातारा) याच्यावर भादविकलम २७९, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद इर्टिगा चालक लक्ष्मण महाडिक यांनी खेड पोलीस स्थानकात दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार साळवी करत आहेत.