दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे प्लास्टर सुरू असताना पाचव्या मजल्यावरून दोन कामगार खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला तर एका कामगाराला कराड येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे मुख्य इमारतीच्या मागील बाजूस एका नव्या इमारतीचे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे इमारत बांधकाम पूर्ण होऊन प्लास्टर चे काम सुरज कुमार ( वय २२) , मयत चंदन साह (वय ३०) व हरेंदर सिंह हे करीत होते. दि.१८ मे रोजी सकाळी हे तिघेही प्लास्टर काम करण्यासाठी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेले होते. यावेळी सज्जावर चढून सुरज कुमार व चंदन साह हे प्लास्टर करीत होते. तर हरींदर सिंग हा आतल्या बाजूला होता, ८.००वा च्या सुमारास अचानक ज्या सज्जावर उभे राहून प्लास्टर सुरू होते तो कोसळला व दोघेही जमिनीवर कोसळले. या मध्ये दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारा दरम्यान चंदन साह ( मूळ रा.बिहार) याला डॉक्टरांनी मयत घोषित केले तर जखमी सुरज कुमार याला कराड येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे