(रत्नागिरी)
भारतीय आयुर्विमा महामंडळ राजापूर शाखेच्या महिला विमा प्रतिनिधीमध्ये पहिल्यांदाच सौ. शिल्पा धनंजय मराठे यांनी 2022 या आर्थिक वर्षात “एमडीआरटी अमेरिका” 2023 हा आंतरराष्ट्रीय बहुमान मिळविला आहे. या उल्लेखनीय यशस्वीतेसाठी एलआयसी विकास अधिकारी श्रीकृष्ण कामतेकर तसेच शाखाधिकारी श्री. बुगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
सौ. शिल्पा मराठे या भाजपा महिला मोर्चाच्या द. रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आहेत. त्यांना एमडीआरटी बहुमान प्राप्त झाल्याबद्दल सौ. शिल्पा मराठे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
एमडीआरटी मानांकनासाठी काही अटी, नियम पाळावे लागतात. आयुर्विमा व्यवसायात हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. एलआयसी विमा क्षेत्रामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून अनेक संधी असून नवीन पिढीने व तरुणांनी विमा व्यवसायात पदार्पण करावे व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन सौ. मराठे यांनी केले आहे.
मिलियन डॉलर राउंड टेबल ही अमेरिकेत 100 वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. दरवर्षी जगभरातील 30 हजार विमा प्रतिनिधी अमेरिकेतील संमेलनात सहभागी होतात. हा बहुमान प्राप्त करण्यात विमा अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सूचना लाभल्या. तसेच ग्राहकांनी एलआयसीवर दाखवलेला विश्वास यामुळे हा बहुमान प्राप्त करताना अत्यानंद होत आहे, असे सौ. मराठे यांनी सांगितले.