( रत्नागिरी / प्रतिनिधी )
कारवांचीवाडी येथे शुल्लक कारणावरुन तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमा एकनाथ खेत्री (खडपेवठार झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रमेश खेत्री (39, कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश खेत्री आणि भिमा खेत्री हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रमेश खेत्री यांची पत्नी कारवांचीवाडी येथील नातेवाईकांकडे बारश्याला गेली होती. तिला आणण्यासाठी आणण्यासाठी रमेश हे गेले होते. या ठिकाणी भिमा हा तिथे आला. त्याने विचारले माझा मेहुणा बसुराज शिंदे हा तुझ्यासोबत होता का? त्यावर रमेश खेत्री यांनी नाही असे उत्तर दिले. आपल्याशी रमेश खोटे बोलत असल्याचा राग धरुन भिमा याने आई-वडिलांवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर हाताला रुमाल बांधून फायटरसारख्या लोखंडी वस्तूने रमेश यांच्या डोळयावर जोरदार प्रहार केला. मात्र हा प्रहार रमेश यांच्या भुवयांवर लागल्याने त्यांचा डोळा बचावला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. जखमी रमेश यांनी ग्रामीण रुग्णालयात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भिमा खेत्री याच्याविरोधात भादविकलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भितळे करत आहेत.