आंतरराष्ट्रीय लायन्स कल्ब च्या नियमावलीनुसार सन २०२१-२२ च्या चिपळुण कार्यकारणीची कोरोनाप्रादुर्भावामुळे ॲानलाईन सभेमध्ये निवड करण्यात आली.यासभेमध्ये लायन्स क्लबचे जेष्ठ व इतर सभासद उपस्थित होते. यासभेमध्ये २०२१-२२ साठी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची निवड करण्यात आली.आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब च्या नियमावलीनुसार सन २०२१-२२ चे अध्यक्ष लायन तुषार गोखले, सचिव ला.जगदीश वाघुळदे व खजिनदार ला.नहुष चितळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी लायन्स अध्यक्ष ला. चंद्रकांत मांडवकर, सचिव ला.जगदीश वाघुळदे, खजिनदार ला.दिनेश धारिया तसेच निवड समितीचे प्रमुख ला.विजयशेठ रतावा, ला.भरतशेठ रेडीज, ला.रमेश रेळेकर, रिजन चेअरमन ला.नितीन गांधी, रिजन सचिव ला.अरुण कदम व इतर सन्माननीय लायन्स उपस्थित होते. या सर्वानुमते अध्यक्ष सचिव व खजिनदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यांचा शपथविधी समारंभ जुलै २०२१ मध्ये होणार आहे.