काँग्रेसचे ओबीसी विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून हा राजीनामा ओबीसी विभाग प्रांताध्यक्ष भानुदास माळी व माजी प्रांताध्यक्ष प्रमोद मोरे यांच्याकडे पाठवला आहे या राजीनामा वैयक्तिक कारणामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे श्री. साळवी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
चिपळूण खेर्डी येथील प्रकाश साळवी हे गेली काही वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत या दोन्ही क्षेत्रात वावरत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेऊन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम यांच्या शिफारशीवरून ओबीसी विभाग प्रांताध्यक्ष प्रमोद मोरे यांनी काँग्रेस ओबीसी विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रकाश यांच्यावर साळवी यांच्यावर सोपवली होती. या पदाला श्री. साळवी यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या या पदाच्या कारकिर्दीत ओबीसी विभाग ९ तालुकाध्यक्षपदी निवड केली.
तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र आता श्री. साळवी यांनी वैयक्तिक कारणामुळे आपण पक्ष कार्यास वेळ देऊ शकत नाही, असे राजीनामा पत्रात नमूद करून आपल्या पदाचा राजीनामा देत असून तो मंजूर करावा असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या ओबीसी व जिल्हाध्यक्ष आणि अचानक राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.