( संगमेश्वर / प्रतिनिधी )
साताऱ्यातील कोयनानगर परिसरात भूकंप झाल्याने मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक भूंकपाचा धक्का बसल्या भांडी पुंडी हळू लागली. महिला वर्ग मात्र घाबरुन गेला होता. मौजे असुर्डे, कोंड असुर्डे, आंबेड खुर्द, धामणी, गोळवली आदी गावांना सकाळी धक्के जाणवले.
साताऱ्यातील कोयनानगर परिसरात भूकंप झाला होता मात्र त्याचे धक्के संगमेश्वरातील नागरिकांना जाणवले. सुमारे 3.4 रिस्टरस्केलचा धक्का बसला. संगमेश्वर, देवरुख परिसरातील काही गावांना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धरणीकंप झाल्याचे जाणवले. नागरिकांमध्ये सकाळी यासंदर्भात कुजबूज ऐकायला मिळत होती. संगमेश्वरातील काही जाणकारांनीही या घटनेला दुजोरा दिला.