( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील उमेश रावणंग यांच्या घरात एक भली मोठी घोरपड दिसून आली. घोरपडीला पाहून लहान मुले घाबरली. त्यांनी गोंधळ केला. मात्र उमेश रावणंग यांनी तिला बराच वेळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ती बाहेर जाण्यास तयार नव्हती. मात्र अथक प्रयत्नानंतर उमेश रावणंग यांनी तिला दोन तासानंतर घराबाहेर काढले. घरामध्ये लहान मुलं व वयोवृद्ध माणसे घाबरल्यामुळे ती बाहेर पळाली. घोरपडीला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
दरम्यान निवळी येथे घोरपड असल्याची माहिती गो सेवा संघाचे सुशिल कदम यांना देण्यात आली. सुशिल कदम आणि अमीत खटावकर यांनी २ तासांच्या प्रयत्नानंतर घोरपडीला पकडून जिवनदान दिले. त्यानंतर घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. उमेश रावणंग आणि त्यांच्या परिवाराने गो सेवा संघाचे आभार मानले.