( रत्नागिरी / प्रतिनिधी )
भारतीय मजदुर संघातर्फे २१ डिसेंबर रोजी मुंबई येथे कामगार बंधु व भगिनींचे मोठे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने कामगारांमध्ये तसेच जनतेमध्ये प्रसार व्हावा यासाठी जनजागृती चेतना रथाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्र भर 6 ते 17 नोव्हेंबर दरम्यान हा चेतना रथ फिरवण्यात येणार आहे.
दरम्यान 13 नोव्हेंबर रोजी २०२२ रोजी हा चेतना रथ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हातखांबा येथे या चेतना रथाचे आगमन झाले. यावेळी भारतीय मजदुर संघाच्या संजना वाडकर यांच्या अनेक संघटनांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर रत्नागिरीच्या दिशेने माळनाका येथून रथाची जनजागृती फेरी रत्नागिरी येथील विविध क्षेत्रातील कामगारांना एकत्र करुन पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, लोकमान्य टिळक यांच्या निवास स्थानाकडून पूढे सरकणार आहे. तेथून पुढे लक्ष्मीचौक येथे सर्व कामगार सभासदांचे मान्यवरांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर पूढे मा. वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन चिपळूण (लोटे) या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे.