(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथील तरूण मच्छीमार व्यावसायिक संतोष श्रीधर डोरलेकर यांचे नुकतेच आकस्मिक दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्षांचे होते.
संतोष डोरळलेकर हे अतिशय मेहनती, कष्टाळू व प्रामाणिक मच्छीमार व्यावसायिक म्हणून परिचित होते. समाजातील विविध धार्मिक, सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या मच्छीमार व्यवसायाच्या जोरावर त्यांनी कुटुंबाचा डोलारा अतिशय मेहनतीने व जबाबदारीने सांभाळला होता. त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबांवर मोठा दु: खाचा डोंगर कोसळला असून खारवी समाजात ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच अंत्ययात्रेला खारवी समाजातील सर्व समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण वरवडे खारवीवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.