(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हीलचेअरची भेट मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी यांच्याकडून देण्यात आली आहे. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात मालगुंड पंचक्रोशीतील अनेक रुग्ण विविध कारणाने येत असतात यांतील काही गंभीर, अपंग, गरोदर माता व अतिवयस्कर रुग्णांना व्हीलचे आवश्यकता असते. याचा सारासार विचार करून मालगुंड प्राथमिक केंद्राला तातडीने व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी यांनी विशेष पुढाकार घेऊन स्वखर्चाने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला आपल्या सरपंच कारकिर्दीतील एक लोकोपयोगी भेट उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वीही सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये काम करताना अतिशय उल्लेखनीय कामाचा ठसा उमटवून अनेक विधायक उपक्रम राबविण्यावर भर दिला. त्याचाच अखेरचा भाग म्हणून आपल्या कारकिर्दीतील आनंद आणखी द्विगुणीत व्हावा या उदात्त भावनेने त्यांनी व्हीलचेअरची भेट मालगुंड प्राथमिक केंद्राला दिली आहे.
त्यांच्या कारकीर्दीतील संपूर्ण कौतुकास्पद कामगिरीचे विशेष कौतुक मालगुंड परिसरातून होत आहे .मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हीलचेअरची भेट मालगुंड आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वालिया यांच्याकडे नुकतीच सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा मालगुंडचे विद्यमान तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, पत्रकार वैभव पवार व सरपंच दीपक दुर्गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वालिया यांचेसह आरोग्य सहाय्यक प्रमोद लिंगायत, संजय बारिंगे, आरोग्य सहायिका देसाई मॅडम, फार्मासिस पाटकुळकर, आरोग्यसेवक मोहन सातव, करपे , झगडे, गावडे, कर्मचारी चव्हाण आदींसह मालगुंड परिसरातील माता -भगिनी उपस्थित होत्या.